Saturday, February 7, 2026
Homeभुसावळअनधिकृत बांधकामांची भुसावळ प्रांत कार्यालयाकडून थेट चौकशी; कारवाईकडे सर्वांचे लक्ष!

अनधिकृत बांधकामांची भुसावळ प्रांत कार्यालयाकडून थेट चौकशी; कारवाईकडे सर्वांचे लक्ष!

जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीची दखल!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील नगरपालिका हद्दीबाहेरील गट क्रमांक ११५ मधील एका अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात नियमबाह्य व अनधिकृत
बांधकाम झाल्याचा गंभीर प्रकार जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केल्या नंतर उघडकीस आला आहे.जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार केल्याने या प्रकरणाची भुसावळ प्रांत कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी,भुसावळ यांच्या कार्यालयाच्या आदेशानुसार सूचनेनुसार संबंधित अपार्टमेंटची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.आणि तसा अहवाल तयार करणार असल्याचे पथकातील अधिकारी यांनी सांगितले.
या अनियमित बांधकाम प्रकरणी या अपार्टमेंट मधील रहिवाशी प्रमोद जगन्नाथ पाटील व संगीता प्रमोद पाटील यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून या प्रकरणी स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमावा अशी मागणी त्यांनी केली होती.या तक्रारीच्या अनुषंगानेच महसूल विभाग,नगररचना विभाग व नगरपालिका विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पथक ५ फेब्रुवारी रोजी घटनास्थळी दाखल झाली.या पथकाने संबधित तक्रारीत असलेल्या विषयावर मोजणी व पाहणी केली व जबाब नोंदण्यात आले आहे.मात्र या अहवालावर तक्रारदार यांची स्वाक्षरी न घेतल्याने कार्यवाही बाबत पुन्हा संशय संशय व्यक्त करण्यात येत आहे.तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित इमारत हाय टेन्शन लाईनच्या जवळ असतानाही बांधकाम परवानगी कशी देण्यात आली ? कारण या ठिकाणी विजेच्या धक्क्याने काही अपघात झाल्यास जिम्मेदार कोण.? हा प्रश्न निर्माण झाला आहे.इमारतीचे पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) मिळण्याआधीच या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी कशी देण्यात आली अशी तक्रार होती.
बिल्डीग पूर्ण झाल्यावर कंपाउंड करणे प्रत्येक बिल्डर साठी आवश्यक असते या अपार्टमेंटला कंपाऊंड नसतांना एनओसी प्रमाणपत्र कसे दिले गेले.? हा प्रश्न उपस्थीत झाला आहे.कारण कपाउंड नसल्याने दारू पिणारे अनाधिकृत व्यक्ती येथे येतात व बिल्डींग मधील व परिसरातील महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.तक्रारदारांनी असेही नमूद केले आहे की,मंजूर नकाशानुसार पार्किंगसाठी राखीव जागेत बांधकाम करण्यात आले आहे तळ मजल्यावर पूर्ण पार्कीग परिसर असतांना त्या ठिकाणी दुकाने काढून विक्री करण्यात आले असून रहीवासी नागरीकांची हक्काची जागा हिरावून घेण्यात आली आहे.पार्किंगमधून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्यक्ष रस्ताच उपलब्ध नाही,जाण्या-येण्यासाठी मोकळी जागा न ठेवता नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.कलम १४२ चे उल्लंघन,तरीही कारवाई शून्य या प्रकरणात जळगाव नगररचना कार्यालयाने कलम १४२ चे उल्लंघन झाल्याचा अहवाल यापूर्वीच दिलेला असतानाही आजवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिक बळावला आहे.यामुळे संतप्त झालेल्या प्रमोद पाटील व संगिता पाटील यांनी उपोषणाचा इशाराही प्रशासनाला दिला होता.प्रांत कार्यालयाकडे अहवाल सादर संयुक्त चौकशी पथकाने घटनास्थळी पाहणी करून सविस्तर अहवाल तयार केला असून तो प्रांत कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.आता या अहवालावरून संबंधित जागा मालक व दोषी अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई केली जाईल याकडे संपूर्ण भुसावळ शहराचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सदर प्रकरणात प्रांत व महसुल विभागात कार्य करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नावाचा उल्लेख आहे ते १० वर्षा पासुन भुसावळ येथे कार्यरत आहे.
अनधिकृत बांधकामांवर प्रशासन कठोर भूमिका घेणार की हे प्रकरणही फाईलमध्येच दबले जाणार? अनाधिकृत मोबाईल टॉवरच्या बाबतीत वृत्त यापूर्वी प्रसिद्ध केले होते त्यानंतर अनेक टॉवर चालकांना दंड भरावा लागला होता.हा प्रश्न आता भुसावळ शहरातील नागरिकांमध्ये, बांधकाम क्षेत्रात चर्चेचा विषय सुरू आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या