Saturday, April 25, 2026
Homeशैक्षणिकसंत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम...

संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम उत्साहात संपन्न !

संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम उत्साहात संपन्न !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी करण्याचे उपाय, अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन तसेच सकारात्मक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. “आत्मविश्वास, नियमित सराव आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे यशाचे मुख्य सूत्र आहे,” असे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. पंतप्रधानांनी दिलेल्या प्रेरणादायी संदेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व परीक्षेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत सकारात्मकता व आत्मविश्वास वाढीस लागला असून आगामी परीक्षांसाठी त्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या