Thursday, January 29, 2026
Homeक्राईमराजकारणासह व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ : मणियार बंधूंपैकी पियुष मणियारावर गुन्हा दाखल..!

राजकारणासह व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ : मणियार बंधूंपैकी पियुष मणियारावर गुन्हा दाखल..!

मणियार बंधूंपैकी पियुष मणियारावर गुन्हा दाखल….!
राजकारणासह व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अत्यंत वादग्रस्त असलेल्या मणियार बंधूंपैकी पियुष मणियार हा गोत्यात आला असून कमरेला पिस्तुल लटकावत,नाचून प्रभाव टाकून दबदबा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.या प्रकारानं मात्र राजकारणात,समाजात मोठी खळबळ उडाली आहे.
Oplus_131072
आयुष आणि पियुष मणियार बंधू हे वादग्रस्त म्हणून गणले जात होते आणि त्यांचा पिस्तूल परवाना रद्द करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी २०२३ पासूनच केली आहे. तथापि,यावर प्रशासनानं काहीही कार्यवाही केली नाही.मध्यंतरी तत्कालीन एलसीबी प्रमुख संदीप पाटील यांच्या प्रकरणात या बंधूंचा सक्रीय सहभाग सर्वांना दिसून आला. यानंतर त्यांच्या पिस्तुल परवाना तपासणीचे नाटक करण्यात आले असले तरी अद्याप देखील त्यांच्याकडे परवाना कायम आहे, आणि यावरच त्याने दहशत, दबदबा निर्माण केला आहे ? याचे उदाहरण एका घटनेतून दिसून आले आहे.दि.२० ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या पद्यालय हॉल येथे “दिवाली सूफी नाईट” या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.यात पियुष मणियार यांनी कमरेला पिस्तल लटकावून नाच,गायन करणाऱ्यावर लाखो रूपयांची उधळण केली.याचा व्हिडीओ गुप्ता यांनी शेअर करत याबाबतची तक्रार केली.
या तक्रारीची दखल घेत पियुष मणियार याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्थानकात पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३०१ / २०२५ शस्त्र अधिनियम १९५९ , कलम ३०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणानं प्रचंड खळबळ उडाली असून मणियार याच्या विरोधात कठोर कारवाई होऊन त्याच्यासह त्याच्या भावाचा शस्त्र परवाना रद्द होणार की,त्यांना पुन्हा वाचविले जाणार का ..? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. खान्देश live करिता संतोष शेलोडेसह मी ….
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या