Saturday, December 13, 2025
HomeBlogमहाराष्ट्रात ‘उडता महाराष्ट्र’चे चित्र; टक्केवारी, दबाव आणि जातीवादामुळे लोकशाही धोक्यात - आमदार...

महाराष्ट्रात ‘उडता महाराष्ट्र’चे चित्र; टक्केवारी, दबाव आणि जातीवादामुळे लोकशाही धोक्यात – आमदार शशिकांत शिंदे

महाराष्ट्रात ‘उडता महाराष्ट्र’चे चित्र; टक्केवारी, दबाव आणि जातीवादामुळे लोकशाही धोक्यात – आमदार शशिकांत शिंदे

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भुसावळच्या प्रचारसभेत सत्ताधाऱ्यांवर तिखट प्रहार करत राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीचे गंभीर चित्र समोर ठेवले. दबाव, खोट्या तक्रारी, भ्रष्टाचार, टक्केवारी आणि जातीय ध्रुवीकरणामुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

शिंदे म्हणाले की, “लोकांनी निवडून दिल्यावरही लोकप्रतिनिधींना धमक्या दिल्या जात आहेत. बीडमध्ये आमच्या आमदारावर खोट्या तक्रारी दाखल केल्या. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.” राज्यात दोन नंबरचे व्यवहार वाढले असून युवकांना व्यसनाधीनतेकडे ढकलले जात असल्याची आरोप त्यांनी केला. पाणीपुरवठा, अमृत योजनेतील भ्रष्टाचार आणि ठेकेदारी व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले की, “भुसावळमध्ये १२–१५ दिवसांनी पाणी येते. योजना फक्त टक्केवारीसाठी आहेत. काही ठिकाणी लेफ्टनंट-राईट हँड म्हणवणारेच ठेक्यांवर बसले आहेत. भाजपचे माजी नगरसेवकही २० टक्के कमिशनवर गब्बर झालेत.”
जातीवादाबाबत त्यांनी स्पष्टपणे इशारा देत सांगितले— “छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना एकत्र आणले. पण आज जात आणि धर्मावर मतांचे विभाजन करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या मतांचे विभाजन करूनच काही जण सत्तेत आले आहेत.”निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, मंत्र्यांच्या वक्तव्यांतून ‘लक्ष्मी दर्शनाची’ भाषा वापरली जाते. “पैशाचा महापूर, मशीनची गडबड किंवा प्रशासनावर दबाव… कोणत्या आत्मविश्वासाने निकाल आधीच सांगितला जातो?” असा सवाल त्यांनी केला.
भुसावळ आणि जळगावातील विकासावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, रस्ते, अमृत योजना, पाणीपुरवठा यांतील कामे अपूर्ण असून ठेकेदारांना फायद्यासाठी कामे खंडीत ठेवली जात आहेत.शेवटी आवाहन करताना ते म्हणाले, “या निवडणुकांमध्ये महायुतीचे मोठे नेते कमी पडत आहेत. आता जनता बदल घडवेल. आमच्याकडे पैसा नसला तरी लोकांचा पाठिंबा आहे; भुसावळची जनता योग्य निर्णय घेईल यावर आम्हाला विश्वास आहे.”
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या