Sunday, February 8, 2026
Homeजळगावबियाणी मिलिटरी स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

भुसावळ : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये दि. ३१ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. कार्यक्रमास पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले, कर्नल अभय मुखर्जी, लेफ्टनंट कर्नल संदीप सिंग तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व मॉडेल श्रद्धा मांगले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी होते. यावेळी सचिव डॉ. संगीता बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी,

मनीष बियाणी, राजीव पारिख, प्रवीण भराडीया, गोपाल ठाकूर, शाळेचे प्राचार्य डी.एम. पाटील, रुद्रसेन गंठीया उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक व शिस्तबद्ध पथसंचलनाने झाली. दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व क्रीडा ज्योत

 

प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. कर्नल अभय मुखर्जी व पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांनी मनोगत व्यक्त केले. या भव्य कार्यक्रमात शाळेच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन पर्यवेक्षक रवींद्र तायडे व हिना पटेल यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डी. एम. पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या