Sunday, February 8, 2026
Homeजळगावपहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा, पूर्वा संघाची विजयी सलामी

पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा, पूर्वा संघाची विजयी सलामी

साकेगाव प्रीमियर लीगला सुरुवात

पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा, पूर्वा संघाची विजयी सलामी

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   :-शहराजवळील साकेगाव जि प शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सी.सी, तर्फे आयोजित ‘एसपीएल सीजन -२ ला बुधवारी सुरुवात झाली झाली. पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा व पूर्वा संघाने सामना जिंकत विजयी सुरुवात केली. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार नीता लबडे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, गटविकास अधिकारी दारासिंग जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, ग्रामविकास

 

अधिकारी विजय सातव यांच्या उपस्थितीत एसपीएल ची प्रतिकृती हवेत सोडून व चेंडू टोलवून करण्यात आली. याप्रसंगी गावातील सत्ताधारी व विरोधी सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. थेट प्रक्षेपण होणाऱ्या साकेगाव प्रीमियर लीग स्पर्धेत आनंद घेण्यासाठी मुंबई, दिल्ली, बेंगलोर अमरावती राजस्थान ,गुजरात यासह गावातील विदेशात गेलेल्या दर्शकांनीही थेट प्रक्षेपण चे आनंद घेतले.याशिवाय स्पर्धेला भाग घेण्यासाठी अनेक शासकीय सेवेत असलेले अधिकारी ,कर्मचारी दाखल झालेले आहेत स्पर्धा च्या खेळाडूंना ऑक्शन पद्धतीने आठ संघमालकांनी पॉईंट्स टेबल नुसार घेतले होते. पहिला सामना ओम साई विरुद्ध ९३ किंग्स इलेव्हन यांच्यात झाला हा सामना ९३ किंगने १७ धावांनी जिंकला. दुसरा सामना योद्धा विरुद्ध एम्पायर यांच्यात झाला योद्धा संघाने हा सामना २८ धावाने जिंकला, तिसरा सामना पूर्वा विरुद्ध वीर भगतसिंग यांच्या झाला हा सामना पूर्वा संघाने चार गड्यांनी जिंकत पुढील फेरीत आपला विजय निश्चित केला. स्पर्धा पुढील तीन दिवस चालणार असून अंतिम सामना शनिवारी दुपारी होणार आहे

 

अशी आहे आयोजन कमिटी

जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, राहुल चौधरी, डॉक्टर दीपक पाटील, अजय चौधरी, रमजान पटेल , राहुल साळुंखे,डॉ कैलास ठाकरे, पप्पू पटेल, भूषण सिंग राजपूत, प्रवीण पाटील, हेमंत वाघ, सचिन सोनवणे, मोहित दामोदर निलेश कोळी, नितीन पाटील.

प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

महामार्ग लगत असलेल्या जि प शाळेच्या मैदानावर स्पर्धेच्या सामन्यातील सामना पाहण्याकरिता क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याशिवाय जि प शाळेच्या चारी कोपऱ्यावर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती, अनेकांनी स्पर्धचा आनंद घेण्यासाठी रजा टाकलेली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या