Saturday, February 7, 2026
Homeगुन्हाधक्कादायक : कौटुंबिक वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती फरार!

धक्कादायक : कौटुंबिक वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती फरार!

धक्कादायक : कौटुंबिक वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती फरार!

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घरगुती वादाचे रूपांतर हिंसाचारात झाल्याची एक धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील वलठाण येथे उघडकीस आली आहे. घरातून हाकलून दिल्याच्या रागातून एका पतीने आपल्याच पत्नीच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून तिला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,छायाबाई शांताराम गांगुर्डे (वय ३५, रा. वलठाण) आणि संशयित आरोपी पती शांताराम धोंडीराम गांगुर्डे (रा. घोडेगाव) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत खटके उडत होते. सततच्या वादाला कंटाळून छायाबाई यांनी पतीला घरातून बाहेर काढले होते. याचाच राग शांतारामच्या मनात धुमसत होता. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास, जेव्हा छायाबाई वलठाण येथील एका घराच्या ओसरीत होत्या, तेव्हा आरोपी शांताराम त्या ठिकाणी दारूच्या नशेत पोहोचला.संशयित आरोपीने प्रारंभी छायाबाईंना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाचा पारा चढल्याने त्याने जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून थेट छायाबाईंच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात छायाबाई रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत छायाबाईंनी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. फिर्यादीवरून पोलिसांनी शांताराम गांगुर्डे याच्यावर गुन्हा नोंदवला असून पोलीस नाईक भगवान माळी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या