Wednesday, March 25, 2026
Homeक्राईमगावठी कट्ट्यासह फरार आरोपीस एकास अटक

गावठी कट्ट्यासह फरार आरोपीस एकास अटक

गावठी कट्ट्यासह फरार आरोपीस एकास अटक

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस नशिराबाद पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान गावठी कट्ट्यासह एकास अटक केली आहे. ही कारवाई दि. 23 मार्च 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली.पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली होती या बाबतीत भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 288/2025 मधील फरार आरोपी चेतन सुर्यभान पाटील (वय 18, रा. वरची अळी, नशिराबाद) हा बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे.
माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ सापळा रचून रात्री सुमारे 8.20 वाजता आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी चंदेरी रंगाचा, काळ्या प्लास्टिकच्या मुठीचा गावठी कट्टा तसेच एक डमी कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक 93/2026 शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . असून पुढील तपास प्रशांत विरणारे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बार बोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने केली आहे .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या