नगराध्यक्ष भंगाळे-मंत्री महाजन भेटीने भुसावळ राजकारणात चर्चा उधाण !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनीधी – भुसावळ शहराच्या राजकारणात अचानक नवा वळण दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी आपल्या नगरसेवकांसह थेट सत्ताधारी मंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथे भेट घेतल्याने भुसावळमधील राजकीय चर्चांना नवे उधाण आले आहे.
या भेटीत शहरातील विकासकामे, प्रलंबित योजना आणि निधीचा मुद्दा मांडला गेला. भुसावळसाठी विशेष निधी देण्याची मागणी देखील करण्यात आली. मात्र, या भेटीमागे फक्त विकासाचा अजेंडा आहे की राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चाहूल आहे, हे शहरात चर्चा घेऊन फिरत आहे.
राजकीय वर्तुळात यावेळी विशेष लक्ष लागले आहे. विरोधकांचे मत आहे की, नगराध्यक्ष थेट सत्ताधारी मंत्र्यांकडे गेल्याने भुसावळमधील राजकीय समीकरणांमध्ये लवकरच बदल दिसू शकतो. दुसरीकडे, समर्थकांचा दावा आहे की, ही भेट शहराच्या विकासासाठी आवश्यक होती आणि निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे.
विशेष तज्ज्ञांच्या मते, या भेटीमुळे शहरातील विकासकामांना गती मिळू शकते, तर राजकीय संतुलनातही हालचाल दिसण्याची शक्यता आहे. आगामी काळात या भेटीचे परिणाम भुसावळच्या राजकारणावर स्पष्ट दिसून येणार आहेत. कारण यापूर्वी गायत्री भंगाळे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचीही भेट घेतली होती . परंतु ना .गिरीष महाजन यांच्या भेटीने हालचाली होवु शकता असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .