Tuesday, April 21, 2026
Homeभुसावळभुसावळनगरी विकासाचे खरे शिल्पकार संतोषभाऊ चौधरी हेच....

भुसावळनगरी विकासाचे खरे शिल्पकार संतोषभाऊ चौधरी हेच….

भुसावळनगरी विकासाचे खरे शिल्पकार संतोषभाऊ चौधरी हेच….

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहर तालुक्याचे आणि रेल्वेचे एक महत्त्वाचे प्रसिद्ध शहर होते आणि आहे काही वर्षांपूर्वी भुसावळ शहराची पूर्ण रचना ही एखाद्या खेडेगावाप्रमाणे होती तत्कालीन कोणत्याही नेत्याला भुसावळ शहराचा विकास करण्याची साधी कल्पना सुद्धा सुचली नव्हती.
भुसावळ शहराचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी शहरातील जामनेर रोड,जळगाव रोड, वरणगाव रोड तसेच यावल रस्त्याचे रुंदीकरण करून भुसावळ शहराच्या सौंदर्यात प्रथम आणि मोठी लक्षवेधी भर टाकली आहे.संतोषभाऊ चौधरी यांचा सर्व समावेशक असा विकासाचा अजेंडा होता त्यावेळेस भुसावल शहरात दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असतात तर भुसावळ शहरातील वरील ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करू शकला नसता परंतु संतोषभाऊंनी भुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन भुसावळ शहराचा कायापालट केला आणि तो सर्वांगीण विकास आजही सर्वांना दिसून येत आहे त्यामुळे भुसावळ शहरात संतोष भाऊ म्हणजे “नो चिंता” असे म्हटले जाते.
बाजारपट्टा भागात केवळ २० ते २५ दुकाने होती त्यामुळे भुसावळ टपरी युक्त दुकानाचे दिसून येत होते परंतु संतोषभाऊ चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ठराविक ठिकाणी अनेक व्यापारी संकुलनाचे बांधकाम करून व्यापाऱ्यांना व्यवसायाची एक कायमस्वरूपी संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली त्यामुळे शहरात सर्व शहरातील ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून येत असल्याने व्यापारी वर्तुळात एक नवचैतन्य निर्माण होऊन भुसावळ शहरात आज एक लक्षवेधी बाजारपेठ निर्माण झाली आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या