जाडगाव जि. प. मराठी शाळेत मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर संपन्न
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील जाडगांव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि आजारी विद्यार्थ्यांना औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा शिबिर उत्सव अतिशय उत्साहात पार पडला.

या शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच गरजू व आजारी विद्यार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन सुरवाडे, गणेश कोळी, गणेश सोनवणे आणि सुजाता सुरवाडे यांनी विशेष पुढाकार घेऊन परिश्रम घेतले. शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

