…सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने केला अत्याचार !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार ऑगस्ट २०२३ पासून सुरू होता.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून करण दत्तू सोनवणे (२०, रा. कांचननगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शनिपेठ पोलिस ठाणे हद्दीतील १६ वर्षीय मुलगी दहावीत असल्यापासून करण सोनवणे याने तिच्याशी ओळख निर्माण केली. दि. १० सप्टेंबर रोजी, या मुलीला दुचाकीवर मेहरुण तलाव परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. मुलीने २६ सप्टेंबरला शनिपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून तरुणाला अटक करण्यात आली. सदर पुढील तपास सपोनि प्रिया दातीर करीत आहेत.