शासकीय नोकरी अमिष प्रकरण; तिसरा संशयित गजाआड, पण.. ‘तो’ चौधरी कोण?
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळात शासकीय नोकरी लावून देण्याचे अमिष देत आर्थिक फसवणूक केल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. यात भुसावळ शहरातील गडकरी नगर, करूनेश्वर महादेव मंदिर जवळील संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने रुक्मिणी फाउंडेशनमार्फत शासनाच्या विविध विभागात शासन सेवक म्हणून नोकरीस लावून देण्याचे अमिष देवून आर्थिक केली. या प्रकरणी प्रशांत अग्रवालसह त्याच्या टोळी विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फरार असलेल्या तिसरा संशयित आरोपीस पोलिसांनी बेळ्या ठोकल्या आहे. तर अद्यापही दोन आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपिचे नाव मेघराज सिंग नारायण सिंग पाटील आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरलीधर सोसायटी घर नंबर १६ जुना तोल नाका, टाटा मोटर्स, फेकरी येथील रहिवासी वसंत जानबाजी ढोणे हे सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस कर्मचारी आहेत. त्यांचे मुलास नोकरीस लावून देण्याचे आमिष देत संशयितांनी त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी संशयित आरोपी प्रशांत अग्रवालसह पाच जणांविरुद्ध २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी प्रशांत अग्रवाल यास अटक करत त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पोलीसी खाक्या दाखविताच संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने विजयकांता सुरेंद्र मुनोद ऊर्फे मेहता मॅडम (रा. पन्नाभवन, वरणगांव रोड गो गॅस पंपाचे शेजारी, शिवाजी नगर), योगेश केशव प्रसाद तिवारी (रा. रिंग रोड, फालक नगर गणेश मंदिर जवळ भुसावळ), मुन्ना मोहन परदेसी (रा. फिल्टर हाऊस रोड, कवाडे नगर, भुसावळ), मेघराज सिंग नारायण सिंग पाटील (रा. साकरी, ता. भुसावळ) अशांनी नावे सांगितली.त्यानुसार, पोलिसांनी सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करत या प्रकरणी प्रशांत अग्रवाल, योगेश केशवप्रसाद तिवारी, मेघराज सिंग नारायण सिंग पाटील यांनी अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहे.
दरम्यान,या प्रकरणात दाखल गुन्ह्यातील आरोपी व्यतिरिक्त चौधरी नामक व्यक्तीचा समावेश आहे.तो साकरी फाटा,गोलाणी परिसरातील रहिवाशी असून या भागात चांगलाच त्याचा दबदबा आहे. बराच व्यक्तीची फसवणूक ही केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.साकरी फाटा, गोलाणी परिसरातील तो चौधरी नामक व्यक्ती कोण? या फसवणूक प्रकरणात त्याचा समावेश आहे का? जर त्याचा या प्रकरणात समावेश असेल तर पोलीस अधिकारी खाकी दाखवणार का? त्याचे नाव गुन्ह्यातून समाविष्ट करण्याऐवजी का वगळण्यात आले? असे एक न अनेक प्रश्न उपस्थित होत नगरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.