पुणे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ‘नेशन फस्ट’ कार्यक्रम !
जिल्ह्यात पत्रकार संघाची मजबूत फळी तयार करणार!
पुणे वृत्तसंस्था – पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या मराठी पत्रकार संघातर्फे सोमवार २३ जून रोजी पुण्यातील सिम्बायोसिस सभागृहात ‘नेशन फस्ट’ हा कार्यक्रम पार पडला.यावेळी मराठी पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यात प्रामुख्याने जळगाव जिल्हाध्यक्षपदी तरुण भारत लाईव्हचे डिजिटल हेड विकास प्रभाकर चव्हाण तर भुसावळ तालुकाध्यक्षपदी खान्देश लाईव्हचे संपादक संतोष शेलोडे तर जिल्हा सरचिटणीसपदी मनोज निळे यांची निवड करण्यात आली. संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी नियुक्तीपत्र देत पदाधिकाऱ्यांची निवड करून जळगाव जिल्ह्यात पत्रकार संघाची मजबूत अशी फळी तयार करून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठविण्याबाबत मजबूत अशी भक्कम फळी तयार करणार आहेत.पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा तसेच सामाजिक उपक्रमात मराठी पत्रकार संघ नेहमीच अग्रेसर आहे.सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यात सोमवारी ‘ नेशन फस्ट’ कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते-वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी,सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक शां.ब मुजुमदार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,तरुण भारत बेळगाव सल्लागार संपादक किरण ठाकूर, लोकमत वृत्त समूहाचे समूह संपादक विजय बाविस्कर,दैनिक पुढारी पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी,पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे,राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक आनंद रेखी,लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक सुशील जाधव आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी,मराठी पत्रकार संघाचे संघटक संदीप पारोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात युद्धात आपला अवयव गमविलेल्या सैनिकांचा गौरव करण्यात आला.याचवेळी पत्रकारीतेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा देखील गौरव करण्यात आला.प्रसंगी संघटन वाढीच्या दृष्टीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली.यात विकास चव्हाण यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी,संतोष शेलोडे यांची भुसावळ तालुकाध्य पदी तर मनोज निळे यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.ही नवीन कार्यकारणी जळगाव जिल्ह्यात पत्रकारांची भक्कम अशी फळी निर्माण करणार आहेत.
कार्यक्रमात युद्धात अपला अवयव गमविलेल्या सैनिकांचा गौरव करण्यात आला. याचवेळी पत्रकारीतेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा देखील गौरव करण्यात आला. प्रसंगी संघटन वाढीच्या दृष्टीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली.