लाकडी दांडके, काठ्या आणि विटांनी पोलिसांवर हल्ला ; एकाला अटक!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आरोपीच्या शोध कामासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याने ५ पोलीस जखमी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भुसावळ येथील बडी खानका वस्तीत,मुस्लिम कॉलनी परिसरात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीच्या शोधार्थ बळोद पोलीस स्टेशन जिल्ह्या अगर ( मध्यप्रदेश ) येथील पोलिसांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठून मदत कामी प्रशांत सोनार, हर्षल महाजन या दोघांच्या मदतीने आरोपी नामे करार अली हुजुर अली याचा शोध घेणेसाठी गेले असता तेथे इराणी महिला व पुरुषांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर शुक्रवार दिनांक १५ जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास हल्ला केला असता यात ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस स्टेशनला १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बळोद पोलीस स्टेशन जिल्ह्या अगर (मध्यप्रदेश) येथील दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे करार अली हुजुर अली याचा शोध घेणेकामी भुसावळ शहरातील खडका चौफुली येथे पोलीस उपनिरीक्षक जोरावर सिंह बन्सीलाल सिसोदिया,राहुल मोहनलालजी विश्वकर्मा,आकाश सुरेशजी टेकाम,शुभम जोशी व बाजारपेठ ठाण्याचे प्रशांत सोनार व हर्षल महाजन असे गेलो असता तेथे माहिती मिळाली की,सदर आरोपी हा मुस्लीम कॉलनी परिसरातील पाण्याची टाकी जवळ जुलफोकार अली बाबर उर्फ श्री इराणी याने घेतलेल्या भाड्याचे घरात असल्याची माहीती मिळाल्याने व सदर ठिकाणी जाण्याकरिता अतिरीक्त पोलीस पथकाची गरज असल्याने पो.कॉ. हर्षल महाजन यांनी फोनद्वारे पोलीस स्टेशनला कळवुन अतिरीक्त पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक राहुल वाघ, विजय नेरकर,रमण सुरळकर, रविंद्र भावसार,महिला पोलीस कर्मचारी सिमा चौधरी,मिनाक्षी घेटे, सोपान पाटील,अमर अढाळे,भुषण चौधरी,योगेश माळी,महेंद्र पाटील असे पथक सदर ठिकाणी हजर झाल्याने सदरवेळी आरोपीस ताब्यात घेणे करीता विरोध करीत असल्याने जमलेल्या जमावावर सौम्य बळाचा वापर करून तेथुन पांगविले व करार अली हुजुर अली यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले.शुभम मुकेश जोशी ( नेमणूक बळोद पोलीस स्टेशन जिल्ह्या अगर, मध्यप्रदेश ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीसात १२ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

