Tuesday, April 29, 2025
HomeBlogकार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यानी लांबविली रोकड !

कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यानी लांबविली रोकड !

कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यानी लांबविली रोकड !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नूतन मराठा महाविद्यालयासमोरील शोलिनो बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्याने रोकडसह ६८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूतन मराठा महाविद्यालयासमोर शोलिनो बिल्डकॉन प्रा. लि. च्या नावाने दुकान आहे. याचे कार्यालय बंद असताना अज्ञात चोरट्याने कार्यालयाचे शटर व दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथून रोख ५८ हजार ५०० रुपये, कॉम्प्युटर सेट, सीसीटीव्हीचा डीव्हीआर सेट असा एकूण ६८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार १९ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी मनीष राजाराम पाटील (४७, रा. भोईटेनगर) यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकों अनिता वाघमारे करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या