Sunday, April 27, 2025
Homeजळगावगिरणा नदीवरील बांभोरी पुलावरून तरुणाने घेतली उडी

गिरणा नदीवरील बांभोरी पुलावरून तरुणाने घेतली उडी

गिरणा नदीवरील बांभोरी पुलावरून तरुणाने घेतली उडी !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील मेहरूण परिसरातील रेणुकानगरात मामाकडे राहणाऱ्या तरुणाने शुक्रवारी रात्री आठ वाजता गिरणा नदीवरील बांभोरी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मेहरूण परिसरातील रेणुकानगरात मामाच्या घरी राहणाऱ्या शुभम सतीश चौधरी (वय २३) या तरुणाने आठ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाच्या कठड्यावर चढून स्वतःला गिरणा नदीत झोकून दिले. घटना पाहणाऱ्या वाहनचालकांनी बांभोरी गावात याची माहिती दिली. ग्रामस्थ व पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र त्या अगोदर नदीत पाणी सोडलेले असल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याला मृतावस्थेत जीएमसीत आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, शुभमच्या आईचे निधन झाले असून वडील मुंबई येथे कामाला आहेत. तो मामाकडे राहून काम धंदा करीत होता. त्याने आत्महत्या कशामुळे केली हे कारण अद्याप समोर आलेले नाही.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या