जळगावात मलाबार गोल्ड अँड डायमंडचे शो रूमचे ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन !
ग्राहकांची रेलचेल वाढली.
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जगातील आघाडीच्या आभूषण विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड ऍन्ड डायमंड्सने महाराष्ट्रातील निरंतर विस्ताराच्या नियोजनाचा एक भाग म्हणून जळगाव येथे नवीनतम शोरूमचे भव्य उद्घाटन झाले. शो रुमचे उदघाटन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते पार पडले.जळगावमधील रिंगरोड परिसरात असलेले हे नवीन शोरूम महाराष्ट्रातील २७ वे आणि भारतातील २८१ वे विक्री दालन आहे.
जी १३ देशांमध्ये ३६० हून अधिक शोरूम्सच्या मलाबारच्या वाढत्या जागतिक जाळ्यात मोलाचे योगदान देत आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला खासदार स्मिता वाघ ,गोल्ड मॅन सागर सपके, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे उप व्यवस्थापक गौतम नायर ,वेस्ट झोन मार्केटिंग मॅनेजर ऋषिकेश पवार व जळगाव शाखेचे प्रमुख अभिषेक भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.जळगाव शहर हे पूर्वीपासून सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते त्यात मलबारचे या ठिकाणी शोरूम आल्याने जळगावच्या सोन्याची अजून क्रेझ वाढणार आहे .उद्घाटनाच्या दिवशी या ठिकाणी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील सुवर्ण प्रेमींनी या शोरूमचा लाभ घ्यावा अशा आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे .