Sunday, April 27, 2025
Homeजळगावदीपक पाटील यांची अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा प्रदेश जनसंपर्क मंत्रीपदी नियुक्ती.

दीपक पाटील यांची अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा प्रदेश जनसंपर्क मंत्रीपदी नियुक्ती.

दीपक पाटील यांची अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा प्रदेश जनसंपर्क मंत्रीपदी नियुक्ती.

आमदार जावळे यांनी केले अभिनंदन.

यावल दि.७   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दीपक नामदेव पाटील रा.मनवेल तालुका यावल यांची राज्यस्तरीय असलेल्या अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा प्रदेश जनसंपर्क मंत्रिपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने रावेर विधानसभेचे तरुण तडफदार आमदार अमोल जावळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राज्य प्रदेशाध्यक्ष नितीन चौधरी, गुर्जर,संस्थापक नरेंद्र गुर्जर,राष्ट्रीय संरक्षक गुर्जर बलराज डेढा,राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग गुजर,उपाध्यक्ष गंगाराम गुर्जर,मनोज वागरे गुर्जर, हेमराज गुर्जर, राष्ट्रीय महामंत्री रवींद्रकुमार रावल यांनी यावल पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दीपक पाटील यांच्या सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्याचा कामकाजाचा सकारात्मक आढावा लक्षात घेऊन त्यांची प्रदेश जनसंपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे त्यांच्या नियुक्तीमुळे आमदार अमोलदादा जावळे यांच्यासह सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह गुर्जर समाजातून सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या