यावल, महाविद्यालयात कराटे प्रशिक्षण उत्साहात संपन्न.
यावल दि.१७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी कराटे प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.
कराटे प्रशिक्षक बापु हसबन ( पी एस एम एस शाळा बामणोद ) यांनी विद्यार्थिनींकडून कराटे प्रशिक्षणात मुष्ठिचे बांधणी व त्याचा वापर सराव तोंडावर व छातीवर प्रहार प्रकारा बाबत प्रत्यक्ष आसन करून घेतली व सविस्तर माहिती दिली.शरीर तंदुरुस्त,बळकट व निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत कराटे हा प्रकार महत्त्वाचा आहे असे सांगितले यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे,डॉ.संतोष जाधव,डॉ. वैशाली कोष्टी,प्रा.भावना बारी,
प्रा.प्रतिभा रावते,प्रा.सुभाष कामडी, प्रा हेमंत पाटील,प्रा नरेंद्र पाटील,प्रा सी.टी.वसावे,प्रा.मनिष बारी,प्रा अक्षय सपकाळे,प्रा.अर्जुन गाढे,प्रा. प्रशांत मोरे,प्रा.ईश्वर पाटील उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी,
प्रमोद भोईटे,रमेश साठे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.