Wednesday, March 26, 2025
Homeजळगावहिंदू सनातन संस्कृतीमध्ये कन्या पूजनाचे विशेष महत्त्व - महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज...

हिंदू सनातन संस्कृतीमध्ये कन्या पूजनाचे विशेष महत्त्व – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज !

हिंदू सनातन संस्कृतीमध्ये कन्या पूजनाचे विशेष महत्त्व – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज !

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भारतीय आर्य हिंदू सनातन संस्कृतीमध्ये कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे कन्या पूजनाचे महत्त्व नवरात्रीनिमित्त सीमित नसून वर्षभर शुभ कार्य करतेवेळी कुवारिका कन्या पूजनाने ते करावे, तिचा सन्मान करावा, प्रणाम करावा असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

वढोदा येथील निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर मध्ये परिसरातील सर्व जाती-धर्माच्या कुवारीका कन्यांचे पूजन करून त्यांना पोटभर स्वादिष्ट भोजन देण्यात आले. भोजनानंतर प्रत्येक कन्येला स्कूल बॅग शालेय साहित्य, चुनरी व शृंगार अशा विविध वस्तू व प्रत्येकी दक्षिणा म्हणून रोख रक्कम देण्यात आली. प्रत्येक कन्येच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. नवरात्रीत ज्या जगदंबेची आपण उपासना करतो, त्या शक्तीची, त्या मातेची छबी आपल्या प्रत्येक माता-भगिनींमध्ये आपल्याला दिसली पाहिजे अशी दृष्टी समाजाची निर्माण व्हावी आणि ‘कन्या’ या पूजनीय आहे शुभ आहेत त्यांच्या पूजनाचे फलित परमात्मा

 

आपल्याला अनेक पटीने देत असतो ही मानसिकता समाजाची तयार व्हावी या उद्देशाने या उत्सवाची सुरुवात श्री निष्कलंक धाम येथे करण्यात आली. निरंतर होत असलेल्या या कन्या पूजनाचा मला आशीर्वाद मिळाला व त्याची फलश्रुती म्हणून वढोदा येथे भव्य निष्कलंक धामचे निर्माण मी करू शकलो असे महाराजांनी यावेळी सांगितले. यावेळी सुमारे ५०० कुवारीका कन्या पूजनासाठी उपस्थित होत्या.

कार्यक्रमासाठी डॉ. विवेक महाजन, डॉ. सोहन महाजन, श्री विलास साळी, बल्लूभाई पटेल, मुख्या. पी. आर. महाजन सर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय संत स�

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या