Thursday, April 30, 2026
HomeBlogजीवा महाले बहुउद्देशीय संस्थेतर्फे नाभिक समाजातील गुणवंतांचा सत्कार.

जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेतर्फे नाभिक समाजातील गुणवंतांचा सत्कार.

जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेतर्फे नाभिक समाजातील गुणवंतांचा सत्कार.

यावल दि.१२     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          यावल येथील श्री जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेतर्फे सोमवार दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक वाचनालयात नाभिक समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी इयत्ता दहावी व बारावी मध्ये तसेच पदवीपर्यंत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाभिक संघ भुसावळ शहर भुसावळचे ज्येष्ठ सदस्य पंडित सनान्से होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे,पश्चिम विभागाचे किशोर वाघ,अखिल भारतीय जीवा सेना या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल टोंगे, युवक जिल्हाध्यक्ष कुणाल गालफाडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश सेठी,उत्तर महाराष्ट्र तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश ठाकरे,समाजसेवक सुधाकर सनान्से,संजय बोरसे व आदी मान्यवरांची उपस्थित होती.या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळ व अखिल भारतीय युवा सेना यांच्या वतीने नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा देखील संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चौधरी यांनी केले.याप्रसंगी सचिन सोनवणे यांनी समाजाच्या विकासासाठी संघटन महत्त्वाचे आहे यावर भाष्य केले. त्याचबरोबर कुणाल गालफाडे यांनी रोजगार मेळाव्याच्या संदर्भात समाज बांधवांना मार्गदर्शन केले.तसेच संजय बोरसे यांनी अध्यक्षांच्या वतीने आपल्या भाषणात समाज विकासासाठी विविध योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाला यावल तालुक्यातील तथा जिल्ह्यातील समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय यावल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवा महाले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी,कार्यकारिणी व दुकानदार संघटना अध्यक्ष व कार्यकारणी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले तर आभार सुपडू वारूळकर यांनी मांडले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या