Thursday, January 29, 2026
Homeक्राईमशहरातील राहत्या घरामध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई!

शहरातील राहत्या घरामध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई!

शहरातील राहत्या घरामध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राहत्या घरामध्ये असलेल्या सुरु कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवार्ड करून दोन महिलांची सुटका केली तर हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई २४ ऑक्टोबर रात्री सावखेडा शिवारात गॅस गोदामाजवळ असलेल्या एका घरात करण्यात आली. या ठिकाणी पाठविलेल्या डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व कुंटणखाना उघडकीस आला.
सावखेडा शिवारात वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्याने डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनंत अहिरे, योगिता नारखेडे, पोहेकॉ. धनराज पाटील, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, सचिन साळुंखे, पोकॉ. योगिता पाचपांडे, प्रशांत ठाकूर, मनीषा पाटील यांनी घटनास्थळी येत कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. त्या जळगाव शहरातीलच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. सदर महिलांचा घरमालक महिलेशी संपर्क आला व त्यातून ती महिलांना वेश्याव्यवसायासाठी घरी बोलावू लागली होती.कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६च्या कलम ३, ४ व ५ (१) (क) नुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या