Thursday, April 30, 2026
HomeBlogवार्ड क्र.८ च्या उमेदवार अनिता सतीश सपकाळे व शारदा दिपक धांडे यांना...

वार्ड क्र.८ च्या उमेदवार अनिता सतीश सपकाळे व शारदा दिपक धांडे यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद! 

वार्ड क्र.८ च्या उमेदवार अनिता सतीश सपकाळे व शारदा दिपक धांडे यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद! 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक 8 ‘अ’ मधून भाजपच्या अनिता सतीश सपकाळे तर ‘ब’ मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार शारदा दिपक धांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून दररोज प्रभागातील मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील बहुसंख्य महिला व पुरुष उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.

समाजसेवक सतीश सपकाळे आणि दिपक धांडे यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र केलेल्या जनसेवेच्या प्रयत्नांच्या जोरावर मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात असून दोघांनी आपल्या सौभाग्यवतींच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे,काल झालेल्या प्रभागातील प्रचाराच्या मिरवणुकीत भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी यांनी उमेदवारांसह सहभाग घेतला होता. प्रभागातील प्रतिष्ठित शेकडो नागरिक, महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. शारदा दिपक धांडे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील मतदारांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
तसेच उमेदवार अनिता सतीश सपकाळे आणि शारदा दिपक धांडे या दोन्ही महिला उमेदवारांचे घरोघरी महिलांनी औक्षण करून जोरदार स्वागत केलेले आहे. यावेळी उमेदवार अनिता सतीश सपकाळे आणि शारदा दिपक धांडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. तसेच सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांनाही एक मत देण्यासाठी आवाहन करण्यात आलेले असून, मतदारांकडून याला भरघोस प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या