Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाअवैद्य वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांच्या ताब्यात. तलाठी मारहाण प्रकरणा मुळे प्रशासन...

अवैद्य वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांच्या ताब्यात. तलाठी मारहाण प्रकरणा मुळे प्रशासन अर्लट

अवैद्य वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांच्या ताब्यात.
तलाठी मारहाण प्रकरणा मुळे प्रशासन अर्लट

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी –
जळगाव जिल्ह्यात तलाठी मारहाण हे अतिशय गंभीर प्रकरण घडल्याने महसूल खात्याच्या कर्मचारी अधिकारी यांच्यावरच वाळू माफिया हल्ला करत असल्याने आता प्रशासन अर्लट मोडमध्ये आले आहे .

या अनुषंगानेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भुसावळ शहरात एक पांढरे रंगाचे विना नंबर प्लेटचे डंपर अवैध पद्धतीने वाळूची वाहतूक करीत आहे. पोलीस निरीक्षकांनी तात्काळ पथकास सूचना देवून कारवाई करण्याचे आदेश दिले असता पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री केली. दि.24 डिसेंबर 2024 रोजी रात्री दिड वाजेच्या दरम्यान नाहाटा चौफुली जवळ सापळा लावला असता एक संशयित विना क्रमांकाचे वाळूने भरलेले वाहन घेऊन तिथे आला असता पथकाने त्यास ताब्यात घेऊन वाहनास जप्त केले.

दरम्यान उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी नुकतेच अवैध बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पारित केलेले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पोळ, कमलाकर बागुल, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे, गजानन देशमुख यांनी कारवाई करून दरम्यान 20,000 हजार रुपये किंमतीची अवैध वाळूने भरलेले डंपर अंदाजे किंमत सात लाख रुपये बाजारपेठ पोलीस ठाणे येथे जमा केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सचिन पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक गिरीश वासुदेव सानप राहणार मेहरूण जळगांव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई मुळे वाळू माफियात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या