Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाआरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या दोघ पोलिसांना अटक !

आरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या दोघ पोलिसांना अटक !

आरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या दोघ पोलिसांना अटक !

पारोळा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अपघात प्रकरणी आरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पारोळा येथील दोन पोलिसांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. हिरालाल देवीदास पाटील (४३, रा. हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर) आणि प्रवीण विश्वास पाटील (४५, रा. पोलिस वसाहत, बसस्थानकाजवळ, पारोळा) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. तक्रारदार हे ७ नोव्हेंबर रोजी दुचाकीने पारोळ्याहून धरणगावकडे जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांच्या दुचाकीची धडक होऊन त्यावरील चालक ठार झाला. याबाबत तक्रारदाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तक्रारदाराची अटक टाळण्यासाठी संशयित दोन्ही पोलिसांनी त्यांच्याकडे ३० हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती १५ हजाराची मागणी झाली.

दरम्यान, प्रवीण विश्वास पाटील याने १५ हजाराची रक्कम घेतली. रक्कम घेताच त्याला अटक करण्यात आली. यातील दुसरा आरोपी पसार झाला आहे. याबाबत वरील दोघा संशयितांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या