केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोर मुलांकडून छेडखानीचा प्रकार.
सुरक्षारक्षक असताना छेडखानी झाली तर इतर सर्वसामान्य मुलींचे काय होणार..?
मुक्ताईनगर दि.२. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडखानी सुरक्षारक्षक असताना काही टवाळखोर मुलांनी केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची घटना जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर
तालुक्यातील कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या यात्रोत्सवा दरम्यान घडल्याने संपूर्ण राजकारणात समाजा त मोठी खळबळ उडाली.केंद्रीय मंत्री खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर मुलीं सोबत सुरक्षा रक्षक असताना सुद्धा त्या टवाळखोर मुलांनी छेडखानी केल्याने गुंडगिरी आणि दादागिरी वाढल्याचे दिसून आल्याने सर्व सामान्य मुलींचे काय होणार. असा प्रश्न समाजात आणि संपूर्ण राजकारणात उपस्थित केला जात असून एका महिला केंद्रीय मंत्री असलेल्या लोकप्रतिनिधीच्या मुलीची खुलेआम छेडखानी झाल्याने पोलीस दल तथा शासन आता नेमकी काय कारवाई करणार.. याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
सविस्तर माहिती अशी की,
छेडखानी करणाऱ्या टोळक्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात दि.२८ रोजीच्या रात्री २ वाजेला दाखल झाला आहे. रक्षा खडसे यांचे अंगरक्षक यांनी फिर्याद दिली आहे. तसेच आज स्वतः केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी ज्या मुलींची छेडखानी झाली त्या मुलींसह थेट मुक्ताईनगर पोलिसात जाऊन ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यासोबतच यात्रेच्या दिवशी संत मुक्ताबाई यांच्या यात्रोत्सवानिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी खडसे कुटुंबीय यांच्यातर्फे असतो त्यावेळेस सुद्धा केंद्रीय मंत्र्यांची मुलगी त्या ठिकाणी फराळ वाटप करीत होती त्या ठिकाणी या टोळक्यातील काही टवाळखोर मुले होती आणि वाईट नजरेने मुलीकडे पाहत होती.त्यावेळेस मात्र या गोष्टीकडे गंभीरतेने घेण्यात आले नव्हते.परंतु त्यानंतर यात्रोत्सवात आकाशी पाळण्यांमध्ये या मुली पोलीस सुरक्षा रक्षकासह असताना सुद्धा त्यांचा पाठलाग करून सदर मुलींची छेडखानी करण्याची हिम्मत या गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून झाली.इतकेच नव्हे तर सोबत सुरक्षा रक्षक म्हणून असलेल्या पोलिसाला सुद्धा दमदाटी करून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.हा प्रकार गंभीर व माफ करण्यासारखा नाही.सदर टवाळखोर मुले शहरातील शाळा व कॉलेज सुटल्यानंतर काही विद्यार्थिनींचा पाठलाग करीत असतात परंतु त्या मुली घाबरत असल्यामुळे संबंधित टवाळखोराविरुद्ध पोलिसात तक्रार करीत नाहीत परंतु यामुळे अनेक मुलींना शिक्षण सोडण्याची वेळ येत याप्रसंगी केंद्रीय मंत्री यांनी म्हटले परंतु यापुढे अशा गुंडगिरी व टवाळखरांची गय केली जाणार नसल्याचेही मंत्री यांनी सांगितले.त्यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिसात ठाण मांडले.या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
संत मुक्ताई यात्रा उत्सवामध्ये हा प्रकार उघडकीस आल्यामुळे मुक्ताईनगर मध्ये खळबळ उडाली आहे. जर एका केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी या ठिकाणी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य मुली व महिलांचे काय होणार..? अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाजात राजकारणात सुरू झाली आहे. या संदर्भात ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी सुद्धा पोलीस प्रशासन नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते ? असा सवाल उपस्थित केला आहे तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुद्धा या सदर्भात पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा केली.तसेच गेल्या तीन ते चार वर्षात मुक्ताईनगर मतदार संघातील मोठ्या प्रमाणात गुंड प्रवृत्ती वाढली असून याला स्थानिक लोकप्रतिनिधींचा आश्रय असल्याचा आरोपही आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे सोबतच ही घटना केवळ माझ्या कुटुंबाशी संबंधित नसून हा एक सामाजिक प्रश्न व सामाजिक समस्या असून त्यावर कायमस्वरूपी आळा बसणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसात अनिकेत भोई,पियुष मोरे , सोहम कोळी,अनुज पाटील , किरण माळी,चेतन भोई, सकचीन पालवे अशा ७ जणांवर ३५४ , पोस्को, आयटी अॅक्ट ६६ (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नागेश मोहिते करीत आहे.दरम्यान या घटनेमुळे आणि विशेष करून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या स्वतःच्या मुलीची आणि इतर काही मुलींची टवाळ खोरांनी खेळखणी केल्याने आता नेमकी काय कारवाई होणार..? आणि टवाळखोर मुलांवर कडक कारवाईसाठी पोलीस काय प्रतिबंध करणार याकडे जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचे समाजाचे लक्ष वेधन आहे.