Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाचुलत भावानेच केला भावाचा खून टाकळी येथील घटना ; दोघांना अटक

चुलत भावानेच केला भावाचा खून टाकळी येथील घटना ; दोघांना अटक

चुलत भावानेच केला भावाचा खून टाकळी येथील घटना ; दोघांना अटक

मुक्ताईनगर —   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.  शेतीच्या वादातून शेतात पार्टी करून चुलत भावालाच संपविल्याची घटना 26 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा शिवारात घडली यात टाकळी येथील तरुणाचा खून करण्यात आल्याने या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान यासंदर्भात मुक्ताईनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून यात आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसात यापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती परंतु त्यात संशय आल्याने मयत तरुणा चा घातपात झाल्याची शक्यता निर्माण झाल्याने पुढील तपास सुरू करण्यात आला त्यावरून एका आरोपीला बराणपुर येथून तर दुसऱ्या आरोपीला टाकळी तालुका मुक्ताईनगर येथून पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान याबाबत टाकळी येथील संजय रामसिंग चव्हाण, (वय ३८ वर्षे), व्यवसाय शेती, रा. टाकळी, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव यांनी फिर्याद दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर फिर्याद मध्ये म्हटले आहे की

टाकळी येथे पत्नी सरला व दोन मुले अक्षय वय १७ वर्षे, विकास वय १४ वर्षे यांचेसह राहतो. मला अनिल, गोविंदा, सुनील असे तीन भाउ आहेत. माझी आई गजुबाई ही सुनीलसोबत राहते.

आमची परंपरागत शेतजमीन महालखेडा शिवारात व टाकळी शिवारात आहे. जयसिंग चव्हाण व जगन चव्हाण असे दोन काका असुन त्यातील जयसिंग व फिर्यादी यांचे वडील मयत आहेत. सदर शेतजमीन करण्यावरुन फिर्यादीचे काका जगन् भावसिंग चव्हाण व फिर्यादी यांच्यात वाद चालु होते. दि. २६/०३/२०२५ रोजी सकाळी सुमारे ०६:०० वा. त्याचा मुलगा अक्षय याने सांगितले की सुनील काका सुरेश मकराम चव्हाणच्या शेताजवळ पडलेले आहे म्हणुन फिर्यादी व मुलगा अक्षय असे मोटरसायकलने टाकळी शिवारातील सुरेश मकराम चव्हाणच्या शेताजवळ गेले तेव्हा फिर्यादीचा भाउ सुनील हा उताण स्थितीत दगडाजवळ बेशुध्द पडलेला होता व त्याचे डोक्यातुन रक्तस्त्राव होत होता. त्याचे जवळ त्याची मोटर सायकल क्रमांक MH 19 AC 4473 ही उभी केली होती. तेथे गावातील रायसिंग जाधव, आनंदा चव्हाण, राहुल जगन चव्हाण असे तेथे होते. त्यांनतर गावातील लोक व पोलीस पाटील तेथे आले व

सुनीलला उचलुन रिक्षाने मुक्ताईनगर येथील सरकारी दवाखान्यात आणले तेथे डॉक्टरांनी तपासुन सुनीलला मयत घोषित केले. सुनील याचा मृत्यु नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास होण्यासाठी पोलीसांनी अकस्मात मृत्यु दाखल करुन तपास सुरु केला. पोस्ट मार्टम झालेनंतर त्याचे शव टाकळी येथे आणुन त्याचेवर रितीरिवाजाप्रमाणे अंतिम विधी करण्यात आला.

त्यानंतर व आई गजुबाई हिला सुनीलबाबत विचारणा केली असता तिने सांगितले की दि. २५/०३/२०२५ रोजी संध्याकाळी सुनीलला प्रवीण जगन जाधव याचे फोन आले होते तेव्हा सुनील घरातुन ताट, पातेले व भाजी बनविण्यासाठी लागणारे मसाले अशा वस्तु घेत होता तेव्हा त्याला विचारले की वस्तु कुठे घेऊन चालला तेव्हा सुनीलने सांगितले की, प्रवीण व बाळु जाधव असे आम्ही आज शेतात पार्टी करणार आहे. त्यानंतर तो मोटरसायकलने घरातुन निघाला होता. त्यांनतर गावातील लोकांकडुन समजले की प्रवीण व सुनील यांनी महालखेडा शिवारात असलेल्या फिर्यादीच्या शेतात त्यांनी पार्टी केली होती.

प्रवीण जगन जाधव व बाळु ममराज जाधव यांचेसोबत महालेखडा शिवारातील विहीरीजवळ जेवण केल्यानंतर सुनील घरी परत आला नाही त्याचा मृत्यु झाल्याबाबत प्रवीण चव्हाण व बाळु जाधव यांनी गावात कोणालाच कळविले नाही यावरून प्रवीण जगन जाधव व बाळु ममराज जाधव आणि इतर कोणीतरी इसमांनी संगनमताने सुनीलच्या डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने वार करुन खुन केला आणि त्याचे प्रेत व त्याची मोटरसायकल क्रमांक MH 19 AC 4473 हे बनाव रचन्याच्या हेतुने टाकळी शिवारातील आमच्या शेताच्या जाण्याच्या वाटेला सुरेश मकराम चव्हाणच्या शेताजवळ टाकुन दिले आहे. म्हणुन माझी प्रवीण जगन जाधव व बाव ममराज जाधव यांचेविरुध्द फिर्याद आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या