Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हाट्रक चालकाकडून पैसे ( रस्त्यावर खंडणी,लूटमार करणारे ) घेणारे ३ वाहतूक पोलिस...

ट्रक चालकाकडून पैसे ( रस्त्यावर खंडणी,लूटमार करणारे ) घेणारे ३ वाहतूक पोलिस कर्मचारी निलंबित केल्याने संपूर्ण पोलीस जोरात मोठी खळबळ.

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ त्याच्या बोलण्यासह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. नाईलाजाने या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून ट्रक चालकाकडून पैसे घेणाऱ्या पवन पाटील यांच्यासह तिघांना निलंबित केल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून सर्वसामान्य वाहतूकदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन दिवसापासून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाचोरा तालुक्यात वाहतूक पोलीस पवन पाटील यांनी केळी वाहतूक करणारे मालमोटार अडवून एका वाहन चालकाकडे ५०० रुपयांची मागणी केली. परंतु, चालक ५० पेक्षा एक रुपया जास्त देण्यास तयार नव्हता.शेवटी पोलिसाने आमची इतकीच इज्जत आहे का ? असे म्हणत मिळालेले पैसे नाईलाजाने स्वीकारले असल्याचं व्हायरल व्हिडीओ 90% जनतेने बघितल्याने पोलिसाला अद्दल घडविण्यासाठी पैसे घेतानाच व्हिडीओ ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये बनवला.ट्रक चालक आणि पोलीस या दोघांमधील संभाषणाची चित्रफीत समाज माध्यमात टाकली.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी यांनी मात्र पोलीस दलाची अब्रू आणि किंमत कायम राखण्यासाठी या घटनेची दखल घेत तातडीने चौकशी करून पवन पाटील यांना निलंबित केले विश्वसनीय वृत्त आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात पवन पाटील यांनी ट्रक चालकाकडून ५० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.या व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यामुळे त्यांनाही निलंबित केले.या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. आणि व अशी वस्तुस्थिती संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ९० प्रमाणात सुरू आहे या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.
जळगाव जिल्ह्यात वाहतूक पोलीस कार्यरत असताना सुद्धा अवैध प्रवासी वाहतूक,मुदतबाह्य वाहने, अवैध दारू वाहतूक,अवैध गौण खनिज वाहतूक,अवैधरित्या गाय, म्हैस,बैल, इत्यादी प्राण्यांची वाहतूक, सागवान लाकडाची वाहतूक,अवैध गुटखा, दारू, नियमबाह्य नंबर प्लेट,नियमबाह्य काळ्या काच,वाजवीपेक्षा जास्त वजनाची मालवाहतूक, सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर अवैध पार्किंग इत्यादी दोन नंबरची अनेक वाहतूक सर्रासपणे सुरू असताना आणि ठिकठिकाणी वाहतूक पोलीस सामुदायिकरित्या तपासणी करून काय काय व्यवहार करतात हे सर्व जनतेला आणि अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत असताना थांबणार आहे का असा प्रश्न जळगाव जिल्ह्यात उपस्थित केला जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या