Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हाडॉक्टरांकडील मोलकरणीला अटक : एलसीबीने घेतले ताब्यात !

डॉक्टरांकडील मोलकरणीला अटक : एलसीबीने घेतले ताब्यात !

डॉक्टरांकडील मोलकरणीला अटक : एलसीबीने घेतले ताब्यात !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – डॉक्टरच्या घरातून सोन्याच्या बिस्कीटांसह २० लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या छाया संग्राम विसपुते या मोलकरणीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (२९ डिसेंबर ) सायंकाळी अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,विवेकानंद नगरातील डॉ. प्रकाश चित्ते यांच्या घरात काम करणाऱ्या छाया संग्राम विसपुते या मोलकरणीने मे ते डिसेंबर २०२४ या दरम्यान घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट चोरून नेले होते. डॉ. चित्ते यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून छाया विसपुते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत असून त्यांनी शनिवारी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यावेळी त्या महिलेने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर रविवारी सायंकाळी तिला अटक करण्यात आली.डॉ. चित्ते यांच्याकडे कामाला असलेल्या मोलकरणीला डॉक्टर दिवसभर रुग्णालयातून येणारे पैसे कुठे ठेवतात, याबाबतची संपूर्ण माहिती होती.

सकाळी पावणेआठ ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान ती काम करून घरी जात असे. पती-पत्नी रुग्णालयात असताना छाया विसपुते ही घरातील कपाटातून ठराविक रक्कम काढून घेत होती. आठ महिन्यात या मोलकरणीने जवळपास २० लाख रुपयांची रोकडसह ५२ ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेल्याचे पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या