Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हातरूणाला दारूच्या नशेत डोक्यात तिघांनी मारला फावडा ; गुन्हा दाखल!

तरूणाला दारूच्या नशेत डोक्यात तिघांनी मारला फावडा ; गुन्हा दाखल!

तरूणाला दारूच्या नशेत डोक्यात तिघांनी मारला फावडा ; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वडनगरी येथे तरूणाला दारूच्या नशेत येवून तीन जणांनी शिवीगाळ करत डोक्यावर फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, नितीन अरूण पाटील (वय ३५) रा. वडनगरी ता. जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून तो आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी २ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गावातील चौकात नितीन पाटील हा बसलेला असतांना गावात राहणारे लखन विनोद चोरमल, संजय जगन्नाथ खाटीक, प्रमोद प्रताप सोनवणे यांनी दारूच्या नशेत येवून नितीन पाटील याला शिवीगाळ करत डोक्यात हातातील फावडा टाकून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या नितीनला तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरूवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे लखन विनोद चोरमल, संजय जगन्नाथ खाटीक, प्रमोद प्रताप सोनवणे तिघे राहणार वडनगरी ता, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या