धरणगाव तालुक्यात तलाठ्यावर झालेल्या हल्या प्रकरणी भुसावळ येथे तलाठ्यांचे काम बंद आंदोलन
भुसावळ प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दत्तात्रय पाटील तलाठी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भुसावळ येथील तलाठी संघटनेने आंदोलन पुकारले आहे .
याबाबत तलाठी संघटनेने भुसावळ तहसीलदार यांना निवेदन दिले असून जोपर्यंत आरोपीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे .
बाळूमाफीया यांची मुजोरी वाढत असून महसूल पथकावर हल्ले होत आहे .
म्हणून वाळू तस्करा वर कारवाई करण्यात गेलेल्या पक्षकावर जिव घेणे हल्ले होत आहेत प्रशासन तर्फे योग्य ते पावले उचलले जात नसल्याने तलाठी दहशत मध्ये आहेत .
जोपर्यंत तलाठी पाटील यांच्यावर हल्ला करणारा गुन्हेगारावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन भुसावळचे तलाठी संघटना करणार आहे .
निवेदनावर तालुकाध्यक्ष पवन नवगाळे ,मिलिंद तायडे , सुनिता वळवी , साधना खुळे , आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत .