फैजपूरला बांग्लादेश हिंदू न्याय यात्रेद्वारे जिहादी शक्तीच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
ऐतिहासिक फैजपूर शहरात बांगलादेशातील हिंदू व अल्प संख्याक समाजावर धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी आज एकत्रित होऊन बांगलादेश हिंदू न्याय यात्रा मध्ये हजारोच्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हिंदू संतप्त भावना व्यक्त करून फैजपूर प्रांतधिकारी बबनराव काकडे यांना जाहीर निषेधार्थ निवेदन पत्र सादर केले. याप्रसंगी अखिल भारतीय संत समितीचे कोषध्यक्ष महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, शास्त्री अनंतप्रकासदासजी, इस्कॉन चे प्रभू कन्हैय्यादासजी, हभप प्रवीणदासजी, कन्हैया दासजी, आ. अमोल जावळे, योगेश भंगाळे, ऍड. कालिदास ठाकूर, डॉ. शेखर पाटील, प्रतीक भिडे, भाजपा कार्यकर्ते भरत महाजन, डॉ. भरत महाजन, हर्षल महाजन, अभिजित चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या न्याय मोर्चाची सुरुवात खंडोबा मंदिर देवस्थान येथून सुरुवात होऊन विद्यानगर मधील प्रांतधिकारी कार्यालय येथे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. येथे निवेदन देण्यापूर्वी सभेला मुख्य संबोधन करतांना महामंडलेश्वर जनार्दन हरिजी म्हणाले की, बांग्लादेशातील हिंदू व अल्प संख्याक जनतेवर होण्यारे अमानुष क्रूर अत्याचार खुले आम होत असताना ही जागतिक मानवधिकार संघटना आता फक्त बघायची भूमिका करतेय. या विरोधात आम्ही सारे संत व तमाम हिंदू समाजाला आज रस्यावर उतरावे लागले आहे.
या बरोबरच त्यांनी आघाडी सरकारचा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सारखा नितिभ्रष्ट नेता आज खुलेआम हिंदू समाजावर विघातक नींदनीय टीका टिपणी करून महाराष्ट्रीय जनतेला वेढीस धरू पाहत आहे तसेच या परिसरातील तसाच नेता महाराजांन विषयी चुकीचे व्यक्तव्य करीत असेल तर अश्या रक्षिसी वृत्तीचा हिंदू समाज करेक्ट कार्यक्रम केल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा ही दिला आहे. साऱ्या विश्वात व भारत हिंदूप्रदान देश असतानाही हिंदू वर होणारे अत्याचारी शडयंत्र आम्ही या सहन करणार नाहीत. बांग्लादेशातील अत्याचारी हिंदू व अल्पसंख्याक जनेतेच्या पाठीशी आम्ही सर्व ताकदीनीशी उभे आहे असं भारत सरकाने जागतिक मानवधिकार संघटना व बांग्लादेश सरकारला संदेश द्यावा. यासाठी हा न्याय मोर्चा असून यापुढे गरज भासल्यास आमचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे संकेत दिले.
याप्रसंगी मानेकर बाबा, शास्त्री अनंतप्रकाशदासजी, प्रभू कन्हय्यादासजी, पवनदासजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रम सूत्रसंचालन ऍड. कालिदास ठाकूर यांनी केले याप्रसंगी सर्व पक्षीय सकल सनातन हिंदू समाजातील व रामराज्य सेवा संघचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष हजारोच्या संख्येने आवर्जून सहभागी झाले होते.