ब्रेकिंग : भुसावळात पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला ; दोघे जेरबंद
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील जाम मोहल्ला भागातील शालिमार हॉटेल जवळील डी.डी.सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख व जवाई दोघे सव्वासात वाजेच्या सुमारास चहा पित असतांना पाच ते सहा इसमांनी हातात बंदूक घेऊन तैरींम अहमद यास गोळ्या झाडून खून केल्याची घटना १० जानेवारी रोजी घडली होती.मागील घटनेची पुनरावृत्ती करीत खून का बदल खून घेणेचे उद्देशाने पापा नगर भागातील गैसिया नगर कब्रस्थान येथे सकाळी साडेदहा वाजेला फातिमा (श्रद्धांजली) अर्पण करून आल्यानंतर कब्रस्थानच्या गेट समोर दोन इसमांनी पूर्ववैमनस्यातून चाकूने मानेवर व पाठीवर सपासप पाच वार केल्याची घटना ता.३१ रोजी घडली असून दोघांना जेरबंद करण्यात आले.रिजवान शेख रहीम असे जखमींचे नाव आहे
खडका रोड भागातील इदगाह येथे मुस्लिम समाज बांधब ईद सणानिमित्त मोठ्या संख्याने एकत्र जमून नमाज पठण करतात.यानंतर आपले पूर्वजांकडून झालेले गुन्ह्याची माफी मागण्यांसाठी पापा नगर भागातील गैसिया नगर कब्रस्थान येथे फातिमा (श्रद्धांजली) अर्पण करतात.यादरम्यान रिजवान शेख रहीम हा युवक साडे दहा वाजेला फातिमा साठी कब्रस्थान मध्ये आल्याची माहिती दानिश माया ऊर्फे अकिल शेख (मुख्य आरोपी वय.१९ ) तसेच जकीरीया ऊर्फे बाबा शेख जुनेस गैस (वय.२४) या दोघांना मिळाली.कब्रस्थानच्या गेट बाहेर दोघे पहारा ठेवून होते.साडे दहा वाजेच्या सुमारास रिजवान शेख रहीम कब्रस्थान चे गेट समोर येताच दोघांनी रिजवानच्या मानेवर व पाठीवर चाकूने पाच वार केले.यावेळी रिजवान रक्ताने माखलेला होता.रुग्णवाहिकेतून जखमीला ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटरला प्राथमिक उपचार करून जळगांव येथे खाजगी रुग्णालयात हलविले.चाकूने वार केल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.