Tuesday, April 29, 2025
Homeजळगावभरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार ; एक गंभीर जखमी!

भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार ; एक गंभीर जखमी!

भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार ; एक गंभीर जखमी!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पाथरी गावातून जळगावकडे निघालेल्या दुचाकीला जळगावकडून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने उडविल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजता वावडदा गावाजवळ घडली. या अपघातात दुचाकीवरील पाथरी गावातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शासकीय महाविद्यालय वैद्यकीय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावेश गोरख पाटील (वय ३५) व योगेश ऊर्फ महेंद्र वसंत जाधव (वय ३८) अशी मृतांची नाव आहेत. तर संदीप शांताराम भिल (वय ३५) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, जळगाव तालुक्यातील पाथरी येथून भावेश गोरख पाटील, योगेश ऊर्फ महेंद्र वसंत जाधव व संदीप शांताराम भिल हे तिघे जण जळगावशहराकडे दुचाकीने येत होते. वावडदा गावाजवळ आले असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, सीझेड ४२४६) या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघे जण दूर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने पाथरी गावात शोककळा पसरली आहे. दोन्ही युवकांच्या अपघाती मृत्यूमुळे पाथरी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांसह पाथरी ग्रामस्थांनी घटनास्थळी व रुग्णालयात गर्दी केली होती. या अपघातातील मयत भावेश गोरख पाटील हा जळगाव शहरातील एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये चालक म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे. तर योगेश वसंत जाधव हे टेलरिंगचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चारचाकी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात भावेश गोरख पाटील व योगेश वसंत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप शांताराम भिल याला पाथरी येथील रहिवासी राहुल पाटील, पंडित महाजन, पोलिस पाटील संजीव लंगरे व योगेश सोनवणे यांनी रुग्णवाहिका बोलावून घेत, तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या