भारताची सुजान पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर परीक्षेत बऱ्हाटे
प्रतिनिधी भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक अमुलाग्र बदल होताना दिसून येत आहेत या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांसोबतच विद्यार्थी व पालकांनी देखील समजून घेतले पाहिजे नवीन शैक्षणिक धोरण हे एकविसाव्या शतकातील नव्या युगाला सामोरे जाणारे शिक्षण आहे हे धोरण यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून भारताची सुजान व सुशिक्षित पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे प्रतिपादन परीक्षेत बऱ्हाटे यांनी केले
पुंडलिक गणपत बऱ्हाटे विद्यालयामध्ये क्षमता समृद्धी प्रशिक्षण 2.0 समारोप समारंभाच्या आयोजनाचे अध्यक्ष परीक्षेत बऱ्हाटे होते यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षणाचे समन्वयक सचिन पाटील कुलपती अशोक तायडे उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनय भोगे यांनी पाच दिवसाच्या प्रशिक्षणात मिळाल्या माहिती दिली. दिपाली भंगाळे, श्याम सावरकर व माधुरी पाटील, साजिद शहा यांनी प्रशिक्षणावर आधारित कवितेचे गायन केले यानंतर मनोगतात दिगंबर सपकाळे, साजिद शहा यांनी प्रशिक्षणामधून नवीन शैक्षणिक धोरणाचा शाळा मूल्यांकनाची माहिती मिळाली असल्याचे सांगितले
सूत्रसंचालन व आभार समाधान जाधव यांनी केले
सुलभक म्हणून सुनील वानखेडे जीवन महाजन रवींद्र निलेश पाटील राहुल भारंबे पंकज सूर्यवंशी अल्पेश कुंभारे गुणवंत पाटील यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे