भुसावळला स्वस्त धान्य दुकानदारांचा जिल्हा मेळाव्यात विविध अडीअडचणीवर चर्चा
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या धर्मपत्नी रजनी सावकारे यांना दिले संघटनेचे निवेदन !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ऑल इंडिया फेयर प्राइस डीलर फेडरेशन नवी दिल्ली संलग्न अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे संचलित जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांचा भुसावळला आज दि. १६ फेब्रुवारी रविवार रोजी रेल्वेचे श्रीकृष्ण चंद्र सभागृह येथे जिल्हा मेळाव्याचे सकाळी ११ वाजता आयोजन भुसावळ तालुक्याच्या वतीने करण्यात आला होता.
या मेळावात स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या आणि अडीअडचणी यावर विविध चर्चा करण्यात आल्या. आगामी काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून शासनापर्यंत कमिशन संदर्भात बैठक लावून संघटनेचे विषय निदर्शनात आणून देण्यावर प्रदेश संघटनांचे
पदाधिकारी आणि जिल्ह्यातील दुकानदार यांची चर्चा झाली. या मेळाव्याला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डी.एन. पाटील, सचिव चंद्रकांत यादव, उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर, भागवत पाटील, जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील जावळे, सचिव सुनील अंभोरे, कैलास उपाध्याय, संतोष माळी, भुसावळ तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, आरिफ मिर्झा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व दुकानदार आणि जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनांचे सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष सह पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्ह्यातील काही महिला शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांची निवड तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्तीची घोषणा राज्य उपाध्यक्ष राजेश आंबुस्कर यांनी केली
प्रास्तविक सुनील अंभोरे यांनी केले तर भुसावळ विभागाचे अध्यक्ष संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केले..आभार भुसावळ तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे यांनी मानले.