भुसावळात गावठी कट्टासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला अटक!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील हनुमाननगर येथील टीव्ही ग्राउंड जवळ बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आहे. जिवंत काडतूस जप्त केले आहे. याबाबत शनिवारी १ मार्च रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भुसावळ शहरातीला हनुमाननगर मधील टी. व्ही. ग्राउंडजवळ संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव (वयः ३२, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) हा तरुण बेकायदेशीरपणे हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी १ मार्च रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत संशय आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तत्ल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे