Sunday, March 16, 2025
Homeजळगावभुसावळ तालुक्यात दोघं अल्पवयीन मुलींना पळविले : गुन्हा दाखल !

भुसावळ तालुक्यात दोघं अल्पवयीन मुलींना पळविले : गुन्हा दाखल !

भुसावळ तालुक्यात दोघं अल्पवयीन मुलींना पळविले : गुन्हा दाखल !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरासह तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांसह भुसावळ तालुका पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील १७ वर्ष १० महिने वयाची अल्पवयीन मुलगी कुटूंबासह वास्तव्यास राहते. ३ मार्चला रात्री २ ते ४ वाजेदरम्यान या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत पळवून नेले. या प्रकरणी ४० वर्षीय पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत. दुसऱ्या घटनेत भुसावळ तालुक्यातील एका गावातील १३ वर्ष ७ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संशयित पवन तायडे कोळी याने आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने भुसावळ तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या