Wednesday, March 26, 2025
Homeजळगावमहामंडळ काल मर्यादा संपलेल्या आणि भंगारयुक्त एस.टी.बसेस रस्त्यावर पळवीत असल्याने प्रवासी,चालक,वाहकांच्या जिवाला...

महामंडळ काल मर्यादा संपलेल्या आणि भंगारयुक्त एस.टी.बसेस रस्त्यावर पळवीत असल्याने प्रवासी,चालक,वाहकांच्या जिवाला मोठा धोका.

ओव्हर हिटमुळे एसटीचा निघाला धूर… यावल आगाराजवळच घडली घटना.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल आगारासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनेक आगारांमध्ये कालबाह्य आणि भंगारयुक्त अंदाजे ४० ते ५० टक्के एस.टी.बसेस विविध रस्त्यावर धावत,पळत आहेत.आज यावल आजाराची एस.टी.बस जळगावहून यावल येथे येत असताना यावल आगाराजवळ अर्धा किलोमीटर अंतराच्या आत एस.टी.बसचे मशीन “ओव्हर हिट” झाल्याने तसेच बसमधून दूर निघायला लागल्याने प्रवासी,वाहक, चालक यांच्यात मोठी घाबरगुंडी उडाल्याची घटना आज दि.९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली यामुळे मोठी खळबळ उडाली.

यावल आगारातील ५०% एस. टी बसेस भंगारयुक्त झालेल्या आहेत,अनेक बसेसवर ठिक – ठिकाणी पत्री ठिगळ लावले आहेत. खिडक्या काच दरवाज्यांची स्थिती दयनीय झाली आहे.आगारात एसटी बसेस साठी लागणारे स्पेअर पार्ट वेळेवर मिळत नसल्याने, तसेच गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत एकही नवीन एसटी बस न मिळाल्याने लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सुविधांसाठी आगार व्यवस्थापक यांच्यासह वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे,एसटी बस यावल डेपोला मिळाल्यापासून किती किलोमीटर फिरली..? याचा आढावा महामंडळासह आरटीओने कधी घेतला आहे का..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून.एस.टी.बस कालबाह्य झाल्याने ओव्हरहीट होत असेल तर आणि रस्त्यात अचानक रेडिएटरमधील पाणी कमी झाले तर रस्त्यात पाणी मिळने सुद्धा आता मुश्किल झाले आहे, त्यामुळेच आज यावल येथे जळगाव यावल येणारी एसटी बस ओव्हर हीट झाल्यामुळे बस मधून ढोर निघाल्याने सुरू असलेल्या बस मधील वाहक चालक व प्रवाशात मोठी घाबरगुंडी उडाली व हे सर्व दृश्य मेन रोडवरील संपूर्ण व्यापारी वर्गाने पाहिल्यावर महामंडळाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले असले तरी यावल आगाराला महामंडळाला उत्पन्न दाखवावे लागत आहे.याबाबत महामंडळासह लोकप्रतिनिधींना आत्मचिंतनाची, आणि संशोधनाची आवश्यकता आहे.पर्यायी नवीन एस.टी.बसेस उपलब्ध करून दिल्याशिवाय आता महामंडळाला पर्याय नाही असे सुद्धा सर्व स्तरात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या