Sunday, April 27, 2025
Homeगुन्हामहामार्गालगत हॉटेलजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या युवकाला गावठी कट्टासह अटक !

महामार्गालगत हॉटेलजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या युवकाला गावठी कट्टासह अटक !

महामार्गालगत हॉटेलजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या युवकाला गावठी कट्टासह अटक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुक्ताईनगरातील महामार्गालगत असलेल्या हॉटेलजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या घोडसगाव येथील अर्जुन जनार्दन सांगळकर (कोळी) (वय २५) याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आल. ही कारवाई गुरुवारी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईमुळे खळबळ माजून गेली आहे.

जिल्ह्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मांडले होते. जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तितकेच नव्हे तर खुन व अन्याय, अत्याचार, चोरी अशा गुन्ह्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील आठवड्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे एकाचा खून करण्यात आला होता गेल्या महिन्यात मुलींच्या छेडखानीचे प्रकारही झाले होते. या प्रकारांमुळे मात्र खरोखरच तालुका व जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र दिसून येत आहे.
महामार्गालगत असलेल्या हॉटेजवळ अर्जुन सांगळकर हा संशयित गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती मिळताच एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे,पो.हे.कॉ श्रीकृष्ण देशमुख, प्रितम पाटील, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी, यांच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या