Sunday, March 16, 2025
Homeक्राईममहीलेच्या विनयभंग प्रकरणी वरणगाव पोलिसांत १० जणांवर गुन्हा दाखल !

महीलेच्या विनयभंग प्रकरणी वरणगाव पोलिसांत १० जणांवर गुन्हा दाखल !

 महीलेच्या विनयभंग प्रकरणी वरणगाव पोलिसांत १० जणांवर गुन्हा दाखल ! 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव येथे महिलेचा विनयभंग व युवकास मारहाण केल्या प्रकरणी दहा जणांवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपींना गुरुवारी अटक करून भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की वरणगाव येथील गणेश नावाचा युवक तीन नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता हौदा जवळ उभा असताना आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याला लाथा बुक्यानी मारहाण केली.तसेच तो निघून गेल्यानंतर त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरातील महीलेला गणेश कुठे गेला अशी विचाणाकरीत घरातील महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून शिविगाळ केली या प्रकरणी महिलेने वरणगांव पोलीस ठाण्यात तत्कार दिली दिली असता दहा संशयीतांना पोलिसांनी गुरुवार (ता. ७ ) अटक करून न्यायालयात हजर केले होते. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
याप्रकरणी वरणगांव पोलीस स्टेशनला निलेश वसंत चौधरी ऊर्फ नाना डेपो,मंगेश पिताबर चौधरी,राकेश ऊर्फ रोहन किशोर पाटील,चेतन प्रमोद पाटील,अल्पेश भरत झोपे,विपुल अनिल बहाटे,विवेक दिपील महाजन,मयुर पंडीत चौधरी, छगन अनिल चौधरी,सर्व राहणार चौधरी वाडा वरणगांव व हितेश गणेश चौधरी ( वय-४० ) राहणार हनुमान नगर वरणगांव यांच्यावर ( ता. ७ ) गुरुवावर रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर संशयित आरोपींना वरणगांव पोलीसांनी अटक करून भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या