यावल एसटीबस स्टॅन्ड आवारात नाथ जल बाटली १५ ऐवजी २० रुपयात विक्री.
यावल तालुका रा. युवक काँ. तक्रारची दखल घेतली आगार व्यवस्थापक महाजन यांनी.
यावल दि.२६. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील एसटी बस स्टॅन्ड आवारात एक चहा विक्रेता १५ रुपये किंमत असलेली नाथ जल बाटली एसटी स्टँड आवारातील प्रवाशांना वीस रुपया त विकत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सतीश चोपडे यांनी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे केल्याने आगार व्यवस्थापक महाजन यांनी तात्काळ दखल घेऊन दुकानदाराची चौकशी करून नातजल बाटली १५ रुपयात विक्री करण्याची सक्त सूचना दिली व प्रवाशांची आर्थिक लूट थांबविली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
आज दि.२६ मार्च २०२५ रोजी शासनाकडून गोर गरीब जनता तसेच प्रवाशांसाठी नाथ जल पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे व ती पाण्याची बॉटल फक्त पंधरा रुपये दराने विक्री करायचे स्पष्ट आदेश सूचना असताना देखील आज यावल एसटी बसस्थानक परिसरात परवानाधारक दुधानी नामक चहा विक्रेता हा एक पाण्याची बाटली २० रुपये दराने विक्री करताना आढळून आला तसेच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे,जुगल पाटील यांनी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे लेखी तक्रार केली असता आगार व्यवस्थापक महाजन यांनी तात्काळ त्या परवानाधारक चहा विक्रेत्याला प्रत्यक्ष समोर बोलावून १ हजार रुपये दंड आकारणी करून यापुढे यावल बस स्टॅन्ड परिसरात नाथ जल पाण्याची बाटली १५ रुपये दराने विक्री करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष आकाश सतीश चोपडे,शहराध्यक्ष योगेश पाटील, उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील, ज्ञानेश्वर सुरवाडे,दिलीप हेगडे चेतन सपकाळे,विशाल कोळी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.