रेल्वेत नोकरीला असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील रहिवासी व रेल्वेत नोकरीला असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिची सोशल मिडीयावर बदनामी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर एका विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहिता ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एका भागात वास्तव्यास असून रेल्वेत नोकरीला आहे. संशयीत अब्दुल रहिम शेख (वय २७, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ) याने दि. १ मार्च रोजी दुपारी साडेतीन ते दि. १५ मार्च व दि. १७ मार्च रोजी सकाळी साडेसहा दरम्यान विवाहितेचा पाठलाग केला व माझ्याशी संबंध ठेव म्हणत गळ घातली, तसे न केल्यास फोटो व्हायरलची धमकी देत पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने अंगावर अॅसीड फेकण्याची धमकी दिली. तसेच मुलासह पतीला ठार मारण्याची धमकी दिली.