वरणगांव येथील श्रीनाथ स्कूल मध्ये नवरात्री उत्सव साजरा
वरणगांव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील श्रीनाथ इंग्लिश मेडियम प्रायमरी स्कूल मध्ये नवरात्री उत्सव सेलिब्रेशन उत्साहात साजरे करण्यात आले आहे .
यावेळी विद्यार्थ्यांनी स्कंदमाता, कात्यायनी ,शैलेपुत्री ,चंद्रघंटा ,मा दुर्गा ,सिद्धीदात्री, कालरात्री ,महागौरी, ब्रह्माचारिनी तसेच डॉक्टर, वकील, पायलट ,ऍक्टर, इंजिनियर ,प्लेयर ,सोल्जर , पोलीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून नवरात्री दांडिया उत्सवाची शोभा वाढवली .
कार्यक्रमासाठी अजय टिंबर ट्रेडर्स व श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज नवदुर्गा उत्सव मंडळ यांचे सहकार्य लाभले .
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारात दांडिया नृत्य सादर करून दाखवले वेशभूषा व दांडिया नृत्य योग्य प्रकारे करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सरिता बाउस्कर यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सरिता बाऊस्कर ,लिपिक दीपक बेंडाळे, उर्मिला चौधरी ,निशा वानोळे ,लीना सोनवणे ,पूजा चौधरी, सुनिता पाटील, सुश्रुषा देशमुख व मीनाक्षी चौधरी यांचे सहकार्य लाभले .