Sunday, April 27, 2025
Homeजळगाववरणगावचा सोहेल कच्छी जेनेसिस एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित .

वरणगावचा सोहेल कच्छी जेनेसिस एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित .

वरणगावचा सोहेल कच्छी जेनेसिस एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित .
वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगाव :येथील सोहेल हमीद कच्छी यास ज्ञानगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, जबलपूर यांनी नवोन्मेष, रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या अद्भुत उत्कृष्टतेसाठी “जेनेसिस एक्सलन्स अवॉर्ड” ने सन्मानित केले आहे.
ज्ञानगंगा इन्स्टिट्यूशन सांस्कृतिक, तांत्रिक आणि विविध स्पर्धांचा समावेश असलेला “ज्ञानोत्सव” फेस्टिवलचे दि .२२ डिसें . ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते, त्यामधे सोहेल हमीद कच्छी याने त्याच्या टीममधील ज्युनियर लर्नर अरहम कच्छी व सुमेध बनसोडे यांच्यासह ज्ञानगंगा येथे रोबोरेस स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता . तेथे त्यांच्या उल्लेखनीय आणि कठोर परिश्रमामुळे सोहेल कच्छीला ड्रोन रेसिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक, इनोव्हेटिव्ह आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक, वादविवाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक, “रोबो सुमो” स्पर्धेसह “रोबोरेस” स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
लॉकडाऊन आणि कोविडमध्ये सोहेल कच्छीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सॅनिटायझर मशीन आणि अॅग्रो बोटवर यशस्वी संशोधन केले होते. ज्ञान गंगा या संस्थेने त्याच्या या कार्याची दखल घेवून त्याला “जेनेसिस एक्सलन्स अवॉर्ड्स” देऊन सन्मानित करण्यात आले.त्याने आजपर्यंत २०० हून अधिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला असून त्यात कल्पना सादरीकरण, रोबोटिक्स स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, नावीन्यपूर्ण स्पर्धा तसेच आयआयटी अंतर्गत संपूर्ण भारतातील विविध स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या