Monday, March 24, 2025
Homeजळगावविकास कार्यात खोडा घालणाऱ्याला मतदार जोडा घालणार : मुख्यमंत्री शिंदे

विकास कार्यात खोडा घालणाऱ्याला मतदार जोडा घालणार : मुख्यमंत्री शिंदे

विकास कार्यात खोडा घालणाऱ्याला मतदार जोडा घालणार :  मुख्यमंत्री शिंदे

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – (कैलास कोळी) महाराष्ट्राचे सरकार हे सर्व सामान्यांचे सरकार असून त्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत सर्व सामान्यांच्या विकासाच्या योजना राबविल्या त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार परंतु विकास कामात खोडा घालणारा मतदार जोडा घालणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित महायुतीच्या पहिल्या मेळाव्या प्रसंगी केले आहे .

मुख्यमंत्री मुक्ताईनगर शहरात अडीच वर्षात तिसऱ्यांदा दाखल झाले .याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार किशोर पाटील आमदार सुरेश भोळे आमदार पंकज मेहता राजेंद्र फडके अशोक कांडेलकर नंदू महाजन अनंतराव देशमुख जयपाल बोदडे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .


सुरुवातीला प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले याप्रसंगी भाजपाचे डॉक्टर राजेंद्र फडके यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की मी जरी बेटी बचाव सदस्य असलो तरी मतदारसंघातल्या बेटीला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरीच्या अंदाजात वक्त बहुत कम है जितना दम है दम लगा दो थोडा तुम जगा दो थोडा हम जगा दे अशा अतिशय जोश पूर्ण भाषण सुरू केले असे सांगून आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा महायुतीचे उमेदवार राहतील .
त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की संत मुक्ताबाई च्या पावनभूमीत या महायुतीच्या मेळाव्यास प्रारंभ होत आहे संत मुक्ताबाई ने भिंत चालवून चांगदेवाचे गर्वहरण केले होते त्याप्रमाण मुक्ताईनगर मतदार संघात आहे या लाडक्या बहिणी इथल्या चांगलेवाचे गर्वहरण केल्याशिवाय राहणार नाहीत हे सांगून महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सांगून मुख्यमंत्री हे सुपरमॅन असल्याचे सांगितले

या मतदारसंघात माझा एकही भाऊबंद नाही परंतु या भाऊ आणि बहिणीने मला खूप प्रेम दिल्याचेही सांगितले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुरुवातीलाच महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील असे जाहीर केले त्यावेळेस प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला होतात्यानंतर ते म्हणाले की या मतदारसंघात कोट्यवधींचा निधी विकासासाठी दिला आहे हा मुख्यमंत्री दोन्ही हाताने येणार आहे लाडकी बहीण योजना बंद पडेल ही योजना केवळ निवडणुकीपूर्ती आहे ती केवळ कागदावर राहील असा विरोधकांनी गाजावाजा केला परंतु ही योजना कधीच बंद पडणार नाही उलट आमच्या सरकार आल्यास आम्ही पैसे वाढवून देऊ कारण हा मुख्यमंत्री कट्टर शिवसैनिक आहे आणि हा दिलेला शब्द पाडणारा आहे असे सांगून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने विरोधक महिलांची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले परंतु यावेळेस समोरच्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला येथील महिलांना लखपती व्हायचे स्वप्न महायुती सरकारने पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असून तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा असण्याचे योजना येताना सरकारने कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही सावत्र भाऊंनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यांना जोडा घाला असेही मुख्यमंत्री म्हणाले .
कार्यक्रमाचे आभार अफसर खान यांनी मानले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या