Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाशहरातील शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई !

शहरातील शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई !

शहरातील शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शाळांसमोर तसेच १०० मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व शनिपेठ पोलिस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत सहा टपऱ्या जप्त करत मालकांवर कारवाई करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, १७ रोजी, चौबे शाळा, मनपा शाळा क्रमांक १७च्या १०० मीटरच्या आत कोटपा कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली होती. तरी टपऱ्या सुरूच असल्याने गुरूवार दि. १९ रोजी पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच महानगर पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहा पान टपरीचालकांवर कारवाई केली आहे. यात इकबाल शेख उस्मान शेख (रा. इस्लामपुरा), शंकर गवळी, भिका गवळी (गवळीवाडा), गनी मोहमद डिगी (भिलपुरा), प्रकाश पाटील (बळीराम पेठ), अब्दुल करीम शेख (काट्या फाईल) यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, साजिद मंसुरी, योगेश ढिकले, युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, भागवत शिंदे, विकी इंगळे, अनिल कांबळे तसेच महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी संजय ठाकूर व कर्मचारी सहभागी होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या