शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांना मुंबई येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कारासह धर्मयोद्धा पुरस्कार प्रदान
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
श्री स्वामिनारायण मंदिर भुलेश्वर, मुंबई-2 येथे ५० वर्षांपूर्वी मुलांच्या संस्कारांचे जतन करण्याच्या उद्देशाने बालसंस्कार मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या बालसंस्कार मंडळाला आज ५० वर्षे पूर्ण झाल्याने भव्य सुवर्ण महोत्सवाचे आयोजन दि. २७ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत गिरगाव चौपाटीजवळ भारतीय विद्या भवन येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी या बालसंस्कार केंद्राचे संचालक तथा खान्देशचे सुपुत्र गोल्ड मेड्यालिष्ट शास्त्री श्री धर्मप्रकाशदासजी यांना सकल हिंदू समाज मुंबई, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन मुंबई, गोरक्षण गौ संरक्षण अभियान, महावीर मिशन ट्रस्ट-हैदराबाद, राजस्थान छत्तीस कौम यांच्या वतीने “महाराष्ट्र गौरव” आणि “धर्मयोद्धा” हे दोघं मानाचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
सदर पुरस्कार शास्त्रीजीनी केलेले राष्ट्र समर्पण, गोसेवा अभियान, देश-विदेशात धर्मप्रचार, व्यसनमुक्ती आणि धर्मसभा यांसारख्या सामाजिक कार्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना देण्यात आला.
या भव्य दिव्य पुरस्कार प्रदान सोहळ्याला राष्ट्रसंत निलेशचंद्रमुनिजी महाराज, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी लक्ष्मीनारायण देव पीठाधीश परमपूज्य १००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज, महोत्सव प्रमुख स.गु.शा.श्री भक्तिप्रकाशदासजी, गुरुवर्य स.गु.शा.श्री धर्मप्रसाददासजी, स.गु.शा.श्री धर्मस्वरूपदासजी स्वामी, स.गु.शा.श्री भक्तिस्वरूपदासजी, स.गु.शा.श्री सूर्यप्रकाशदासजी, स.गु.शा.श्री आनंदस्वरूपदासजी आणि इतर संत उपस्थित होते. आचार्यश्री त्याचप्रमाणे संतांनी आपल्या मनोगतामध्ये शास्त्रीजींचे मनभरून अभिनंदन केले. श्री हार्दिक हुंडिया मुंबई, मोहनजी माळी कुलाबा, रमेश जैन कुलाबा, चेनाराम प्रजापती कुलाबा , वेलाराम चौधरी, दिनेश जैन मुंबई या मान्यवरासह मुंबई, सूरत, आनंद, वडोदरा, शिकागो, फिनिक्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई अशा देश-विदेशातील सुमारे दोन हजाराच्या वर हरिभक्तांनी या पवित्र कार्यक्रमास उपस्थिती दिली.