सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे पोलीस विभागाचे आवाहन
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सायबर गुन्ह्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावध राहावे
मोबाईलवर चॅटिंग करताना, बोलताना विशेष प्रकारची काळजी घ्यावी. महिला भगिनींना वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका.मोबाईलचा उपयोग जगातील माहिती एकत्रित करण्यासाठी करा.असे प्रतिपादन सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथील पोलीस अंमलदार श्री.अरविंद वानखेडे यांनी केले आहे.
ते प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PMUSHA) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच विद्यार्थ्यांकरीता “संवेदनात्मक उपक्रम कार्यशाळा ” संपन्न झाली .

त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम वर्ष विज्ञान या वर्गातील कु.राजश्री बराटे, कु. धनश्री जंगले,कु.मयुरी सापकर, कु. नेहा कुंभार, कु. गायत्री भोळे यांनी स्वागत गीताने केली. कार्यशाळेचे उद्घाटन अहिल्याबाई कन्या विद्यालय भुसावळ येथील शिक्षक व पर्यावरण तज्ञ श्री. नाना पाटील सर व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.
यावेळी प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे आपल्या मनोगतात म्हणाले की,” या कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अवश्य करावा. आर्थिक साक्षरता,डिजिटल साक्षरता,सामाजिक साक्षरता आणि पर्यावरण साक्षरता या चारही घटकांवर विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा. आणि आपले भावी आयुष्य सुरक्षित करावे .
या कार्यशाळेमध्ये एकूण चार सत्रे संपन्न झाली. पहिल्या सत्रात पर्यावरण साक्षरता या विषयावर श्री. नाना पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण कसे जपावे,वृक्ष लागवडीचे फायदे,प्लास्टिकचा वापर कसा टाळावा, प्रत्येक विद्यार्थ्याने एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबवावा, आपल्या आप्तस्वतीयांच्या स्मरणार्थ एखादा वृक्ष लावावा, त्याचे संवर्धन करावे तो जगवावा. असे उपस्थितांना आवाहन केले तसेच मी वृक्ष लागवड करणार याबाबतची प्रतिज्ञा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन व आभार कार्यशाळा समन्वयक प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात डिजिटल साक्षरता या विषयावर सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथील पोलिस अंमलदार श्री. अरविंद वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व काही केस स्टडी सांगितल्या.
या सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. जतिन मेढे यांनी केले.
तिसऱ्या सत्रात
सामाजिक साक्षरता या विषयावर भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमती.आरती चौधरी यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की, विद्यार्थ्यांनी समाजशील होणे गरजेचे आहे,मी समाजाचा एक घटक आहे, समाजाचं मी भलं करू शकणार आहे,समाज साक्षर झाला तर देश साक्षर होईल यासाठी मी वाटेल ते करेल,असा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मीनाक्षी वाघुळदे यांनी केले.

चौथ्या सत्रात जळगावच्या मु.जे.महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या प्राध्यापिका व कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या श्रीमती डॉ.सुरेखा पालवे यांनी अत्यंत साध्या आणि सरळ भाषेत आर्थिक साक्षरता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. सुरेखा पालवे यांनी असे प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आर्थिक काटकसरीचा उपयोग करावा, पैशांचे महत्त्व समजून घ्यावे. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये, मोबाईल वरून येणाऱ्या आर्थिक स्वरूपाच्या विविध फसव्या योजनांपासून सावध राहावे. असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले . कार्यशाळा समारोपाच्या प्रसंगी ईश्वर आनंदा चौधरी (धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैजपूर), रवींद्र पाटील (धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर),प्रतीक राधेश्याम मेघे (बहिणाबाई अभ्यासिका भालोद ) या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतातून कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग झाला हे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची कार्यशाळा सातत्याने आयोजित करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यशाळेमध्ये प्रातिनिधीक रूपात काही विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच फैजपुर महाविद्यालयातील प्रा.अक्षय महाजन,समारोप कार्यक्रमाला डॉ. सुरेखा पालवे, प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे, उपप्राचार्य मुकेश चौधरी,कार्यशाळा समन्वयक डॉ.सुनील नेवे, समिती सदस्य डॉ. जतिन मेढे, डॉ.मीनाक्षी वाघुळदे,प्रा.राकेश चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये कला व विज्ञान महाविद्यालय भालोद, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय ऐनपूर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल,संत गाडगेबाबा पॉलिटेक्निक कॉलेज भुसावळ येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे होते. सूत्रसंचालन डॉ. दिनेश पाटील तर आभार प्रदर्शन डॉ. सुनील नेवे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा मुकेश चौधरी, कार्यशाळा समन्वयक डॉ.सुनील नेवे ,डॉ.जतिन मेढे,डॉ.मीनाक्षी वाघुळदे,प्रा. राकेश चौधरी, डॉ. किरण चौधरी,डॉ. गणेश चौधरी,डॉ.मोहिनी तायडे, प्रा.राजेंद्र इंगळे,प्रा.काशिनाथ पाटील,डॉ.अजय कोल्हे,डॉ.वसंतराव पवार,डॉ.पद्माकर सावळे,डॉ.आशुतोष वर्डीकर,डॉ.दिनेश पाटील,डॉ. दिनेश महाजन,डॉ.दिगंबर खोब्रागडे,डॉ.मुकेश पवार,प्रा.चंद्रकांत वानखेडे,प्रा.भावना प्रजापती,प्रा. कोमल सावळे,प्रा.फाल्गुनी राणे,प्रा.गीतांजली चौधरी,प्रा.हेमलता कोल्हे,प्रा.शैलजा इंगळे,प्रा.कुनिका परतणे, कर्मचारी दिलीप इंगळे,श्रीमती.मोहिनी चौधरी,श्री.किशोर चौधरी,श्री.बाळकृष्ण चौधरी,श्री.कल्याण r चौधरी,श्री.रूपम बेंडाळे,श्री.मुबारक तडवी,श्री.पंकज नेहेते यांनी विशेष परिश्रम घेतले.